साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा




भिवंडी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय, श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, श्री. पंडित बाबुराव चौघुले कॉलेज ऑफ फार्मसी, भिवंडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात अनेक फलक प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारे अशाने सजवले गेले. विविध देश भक्तीपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगदार झाला. तसेच महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाची सुरेख रांगोळी रेखाटली गेली.

ध्वजवंदन श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. इंद्रपाल चौघुले यांच्या शुभहस्ते झाले.


यावेळी संस्थेचे सचिव श्री. सुभाष चौघुले, सौ. शितल चौघुले,  कार्यकारी अध्यक्ष श्री. श्याम चौघुले, श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गायत्री पाटील, श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक दहिवले, श्री. पंडित बाबुराव चौघुले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संकेत धाराशिवकर, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक श्री. सौरभ सिन्हा, सहायक प्राध्यापक अंबर जोशी, सहायक प्राध्यापक विठ्ठल दिवेकर, सहायक प्राध्यापक विणा कोंडा, सहायक प्राध्यापक सायली ठाकूर, ग्रंथपाल अलका मिलिंद ढगे, ग्रंथपाल समिधा पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या परिसरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, ध्वजवंदन, विविध गुणदर्शन कार्यक्रम, देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम, विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना या वेळी प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. गुणवंतांचा सत्कार, आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

विद्यालयाने फायनान्स विषयी कोर्सेस सुरु करावे - सौरभ सिन्हा, व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा

महाविद्यालयाने फायनान्स विषयी कोर्सेस सुरु करावे - सौरभ सिन्हा, व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा

आपले महाविद्यालय हे अतिशय चांगले विद्यालय आहे. विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी फायनान्स विषयी कोर्सेस सुरु करावे जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल व स्पर्धेच्या युगात त्यांना चालना मिळेल.


त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर  - प्राचार्य डॉ. विनायक दहिवले

साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी कै. महादेव बाबुराव चौघुले यांनी भिवंडी सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी दूरदृष्टीतून लावलेल्या रोपट्याचे रुपांतर आता सर्वसुविधांयुक्त महाविद्यालयरुपी वटवृक्षात झाले आहे आणि हजारो विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेऊन आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करताना दिसत आहेत.


संविधान बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे - डॉ. गायत्री पाटील, प्राचार्य (विधी महाविद्यालय)

1 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढे 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले. संविधान सभेने संविधान बनवण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण 22 समित्या नेमल्या होत्या. संविधान तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा होता. फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या 292 झाली. समितीच्या 11 बैठका झाल्या. त्या 165 दिवस चालल्या. समितीच्या 19 उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. संविधान सभेने संविधानाच्या प्रत्येक कलमावर चर्चा केली होती. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या 44 सभा झाल्या. संविधान सभेने संविधानाच्या प्रत्येक कलमावर चर्चा केली होती. संविधान सभेनं 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले. 26 जानेवारी, 1950 रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी 254 दौत आणि 303 पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी 6 महिने लागले. तसेच संविधानाचे आदर करणे हा आपला कर्तव्य आहे.


आपल्याला मिळालेले अधिकार हे सहजासहजी मिळालेले  नाहीत - सुभाष चौघुले, सचिव

26 जानेवारी उत्सव हा संपूर्ण देशात साजरा केला जातो. आपण गुण्या आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. जगाच्या इतिहासात भारतासारखा लोकशाही देश सापडणार नाही. सुखी आणि समाधानाने जगण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याला संविधानामुळे मिळालेले अधिकार आहेत. आणि ते अधिकार आपल्याला सहजासहजी मिळालेले अधिकार नाहीत त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान केले असून त्यामुळे आपण आज आपले जीवन लोकशाही पद्धतीने जगत आहोत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी, मालमत्तेच्या हक्कासाठी, आणि स्वरक्षणासाठी अनेक अधिकार दिले. त्यांनी तयार केलेल्या कायद्यांमुळे महिलांच्या हक्कांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले. 


डॉ. बाबासाहेबांचे गुण आत्मसात केले तर जीवनात यशस्वी व्हाल - श्री. इंद्रपाल चौघुले, अध्यक्ष

डॉ. बाबासाहेबांनी अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करून यश स्वतःकडे खेचून आणले आहे. बाबासाहेबांनी स्वतः विद्यार्थ्यानी काय करावे वा काय करु नये हे तर सांगितले आहेच पण आपण ही त्यांच्या जीवन क्रमावरून त्यांचे हे गुण अनुभवून आत्मसात केले तर जीवनात यशस्वी होण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. तसेच संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांचे आचरण करणे होय. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.


विद्यालयीन कोणतेही कार्यक्रम यशस्वी होण्यामागे विद्यार्थ्यांचा खुप मोठा वाटा व योगदान असतो. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहायक प्राध्यापक विठ्ठल दिवेकर व NSS एनएसएस चे विद्यार्थी तसेच NAAC चे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असतात व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी योग्य पद्धतीने कार्यक्रम साजरा व्हावा म्हणून मेहनत घेतली.

















Post a Comment

Previous Post Next Post